रात्रं दिवस देवा तुझी मूर्ति ध्यानात
रात्रं दिवस देवा तुझी मूर्ति ध्यानं |
त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझे भगवंत ||
रात्रं दिवस देवा तुझी मूर्ति ध्यानं |
त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझे भगवंत ||
त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझे भगवंत ||
अश्वसेन राजा हो तुमचे पिता |
वामादेवी राणी हो तुमची माता ||
उदरी जन्मासि आले हो भगवंत ||१|| त्याचा ..
इंद्रइन्द्राणी हो आले नाचत |
बालासी नेले हो मेरु पर्वत ||
जन्मोत्सव करी हो बहु आनंदित ||२||त्याचा...
नाम ठेविलो हो पार्श्वनाथ |
नग्न दिगंबर मूर्ति हो बहु शोभत ||
सिंहासन छलके हो रत्नजडित ||३|| त्याचा...
वीतराग मूर्ति हो मंदिरात |
दर्शन धेता विघ्न हो दूर होतात ||
आशीर्वाद दयावा आम्हां भगवंत ||४||त्याचा...
लासुर गावामध्ये पार्श्वनाथ |
लासुर गावामध्ये नेमिनाथ ||
मुनि श्रावक येती हो दर्शनास ||५||त्याचा...
२०१३ सालच्या चातुर्मासात उपाध्याय मयंकसागर सानिध्यात
जिनधर्माची हो रुध्धि झाली ||१|| त्याचा...